व्यथा
This story is related to two children.
भंगार गोळा करणार्या लोकांची एक चाळ जिचे
भंगार गोळा करणार्या लोकांची एक चाळ जिचे
नाव " भंगार चाळ " .
चाळीच्या दोन्ही बाजूंनी पत्र्यांची रांग लागलेली
आणि ते उभे आडवे
आणि ते उभे आडवे
बांधलेले पत्रे हेच त्या लोकांची घरे.
चाळीच्या एका बाजूच्या सुरवातीला आणि
शेवटीच फक्त सिमेंटची दोन
घरे तेही ठेकेदाराची .
शेवटीच फक्त सिमेंटची दोन
घरे तेही ठेकेदाराची .
चाळीच्या दुसर्या बाजूला ठीक मध्यभागी राम्याचे घर,
पुढून तीन पत्रे उभे आणि आतुन दोन आडवे अशा
दोन भाग केलेल्या खोल्याचे .
पुढून तीन पत्रे उभे आणि आतुन दोन आडवे अशा
दोन भाग केलेल्या खोल्याचे .
राम्यान फास घेतला आणि मेला का तर त्याची
बायको दुसर्या सोबत पळून गेली .
बायको दुसर्या सोबत पळून गेली .
त्याची दोन पोरे _मलज्या आणि सावळ्या_मलज्या तीन तर
सावळ्या दोन वर्षांचा. सकाळी आठ वाजता दोघांची जोड
घरातून बाहेर निघाली आणि चालत चालत शेजारील घराच्या
दारावर आली तेथील बाई चुलीवर स्वयंपाक करत होती
घरातून बाहेर निघाली आणि चालत चालत शेजारील घराच्या
दारावर आली तेथील बाई चुलीवर स्वयंपाक करत होती
आणि नवरा शेजारीच बसला होता.
मलज्या : काकु काकु मला खाऊ ..
बाई : हे बघा, आई पळून गेली आणि बापानं फास घेतला,
आता ही पीडा आली आमच्यात वाटणी व्हायला.
नवरा : आग लहान आहेत ते.
बाई : लहान आहेत, तर घ्या की मुतवून तोंडात आणि
आपली द्या वार्यावर सोडून.
ती बाई ओरडल्या मुळे मलज्या रडायला लागतो.
नवरा : मलज्या ये ये, हे धर चाकलेट.
( खिशातून चाकलेट काढून देतो. )
बाई : हो भोंगळ्या घरी.
तिथुन ते दोघे तपल्या घराकडे निघतात , मलज्या ला कपडे
नसतात तर सावळ्या चा शर्ट पाच ठिकाणी फाटलेला असतो
तसेच त्याची चड्डी खालून पुर्ण फाटलेली असते.
घरात जातात आणि दोघेजण दोन मोडक्या खेळणी
बरोबर खेळत बसतात.
संध्याकाळी 7:30 च्या सुमारास सावळ्या आणि
मलज्याला भुक लागते, भुकेने मलज्या रडायला लागतो
सावळ्या : का झाल तुला रडायला , पिटया ( टोपणनाव )
पिटया : दादा खाऊ खायचा
पलीकडे ठेवलेल्या हांड्यातील पाणी घेतो आणि त्याला देतो
सावळ्या : हे घे पाणी, मी खाऊ घेऊन येतो.
हा घराच्या बाहेर येऊन चाळीत हिकडे तिकडे पाहतो
बाहेर कोणीच दिसत नाही.
शेजारी चपाती मागायला जाव तर सकाळी ती
बाई कशी बोलली याची आठवण होते.
एका एका घरी विचारत जाऊ लागतो .
पहिल्या घरी जातो आणि आत डोकावून पाहितो तोच
आतुन आवाज येतो खवळलेल्या सारखा
आतुन : कोण आहे रे
हा भितो आणि तसाच मागे मागे सरत येतो आणि मागे
येत असताना सायकलला धडकतो आणि पडतो, सायकल
वाला त्याच्या कडे न लक्ष देता घाईत तसाच निघून जातो.
याच्या हाताच्या कोपर्याला खरचटते . हा उठून चार पाच
घरे झाल्यावर एका घरात जातो ,
सावळ्या : मावशे खायला दे की ग
मावशीच पोरग लहान असत पण त्याला चापटा मारू लागत.
मावशी : घरी जा थोड्या वेळाने आणून देते ,
आम्ही जेवायचोय आजुन
हा मावशी वर विश्वास ठेवून घरी जातो. दोघे भाऊ
दरवाजाकडे तोंड करून मावशीची वाट पाहत बसतात.
एक तास झाल्यावर मावशी राहीलेलं सगळ अन्न एका
कागदात घेऊन येते पण तोवर मलज्या झोपलेला असतो.
सावळ्या : पिटया ये पिटया ऊठ ,
हे बघ मावशीने खायला दिले आहे.
सावळ्या त्याला हालवून उठवतो .
पिटया : दादा खाऊ खाऊ ...
( त्या पेपर ची घडी उलगाडत )
सावळ्या : हो खाऊ खाऊ.
ना बाप ना माय
पोट भरण्याचे हाय
मावशी घरचे उरलेले देय
तेच आपला खाऊ हाय
सुटला प्रश्न पोट भरायचा
शेजारील उरलेल्या ताटातला
ना कपडा ना लता
हिंडू याचे त्याचे घरा
हाजीर आम्ही सदा
उशट्या पत्रावळ्या कोणाच्या लग्ना
हे जेवत असताना सावळ्या आपल्या भावला
समजावतो या ओळीतून.
दुसर्या दिवशी सकाळी 10 वाजता चाळीत एका
ठेकेदाराची पोरे खेळत असतात त्यांच्या घरासमोर.
मलज्या ते पाहात बसलेला असतो, त्या दोन पोरांच्या
हातात खेळण्यातली दोन मोठे ट्रक असतात .
त्यातील एक ट्रक मलज्या त्या पोराच्या हातातून
हिसकावून घेतो आणि घेतल्या बरोबर
तो मुलगा रडायला लागतो.
हा रडलेला आवाज ऐकू आल्यावर त्याचे वडील बाहेर
येतात आणि मलज्या च्या हातातील गाडी घेऊन
त्याच्या कानाखाली एक चापट लावतात. मलज्या रडत
लागतो आणि घराकडे पळतो पुढून त्याचा भाऊ सावळ्या
येतो आणि त्याचे डोळे पुसत पुसत त्याला मिठीत घेतो.
एका वर्षा नंतर
वेळ संध्याकाळ 11 वाजता, उद्या सरकारी अधिकारी
तेथे होणार्या घरांच्या भुमी पुजन करण्यासाठी येणार होते ,
त्यामुळे तेथील पत्र्यांची घरे काढण्यास सगळी
माणसे कामाला लागतात.
ही दोघेजण गाढ पणे त्यांच्या घरात झोपलेली असतात
आणि तेथील माणसे त्या दोघांना उचलून चाळीच्या
पलीकडे असणार्या झाडाखाली ठेवतात.
हे दोघेजण सकाळी आठ वाजता उठतात. उठून बघतात
तर ते एका झाडाखाली असतात आणि पुढे सगळे पटांगण
दिसते पण त्यांचे घर त्यांना दिसत नाही.
मलज्या : दादा आपले घर
सावळ्या : काका आमचे घर
काका : तुम्हाला घर नाही , हे झाडच तुमचे घर.
मलज्या : दादा आपल घर मोडल .
सावळ्या : हो, नाही आता आपल्याला घर .
आई आपल्याला विसरून निघून गेली.
तर बाप मरून गेला .
या लोकांनी टाकून दिलेल्या वस्तू प्रमाणे भंगारा
सारख आपल्याला फेकून दिल भंगार म्हणून.
यांच्या सारख आपला बाप भंगारवाला होता.
मलज्या चल
( दोघेजण भंगार असणाऱ्या ढिगार्याकडे चालू लागतात. )
मलज्या : दादा कोठे जायचय ( जाता जाता मलज्या विचारतो )
सावळ्या : चल त्या भंगाराकडे !
भंगार होण्यासाठी !
ती त्या भंगार वाल्या शेठ कडे जातात
आणि कामाला सुरुवात करतात .
सावळ्या एक भंगार उचलतो आणि त्या गाडीत भरतो
पण भरत असताना ते खाली पडते.
लगेच शेठ येतो आणि त्याला वडत आणतो आणि
भंगाराच्या ढिगा मध्ये ढकलून म्हणतो
शेठ : निवड ते .
शेठ : निवड ते .
त्या ढिगावर पडल्यावर
मलज्या : दादा, लागलं का तुला? दादा तुला
त्याने का मारले?
सावळ्या : काही नाही, हे भंगार आहे आणि ही आपली व्यथा
( येथे व्यथा ही दोन बाबींसाठी संबोधली आहे
1 शेठ ने मारलेले म्हणजेच त्यांचे हाल
2 भंगारा साठी )


