लढवय्ये
Indian Army
Indian Army
लढवय्ये आम्ही लढवय्ये
लढवय्ये आम्ही लढवय्ये
लावून कपाळी टिळक मातीचा
आहोत वेशीवर उभा
सज्ज आम्ही सदा
रक्षण करण्या भारत देशा
लढवय्ये आम्ही लढवय्ये
लढवय्ये आम्ही लढवय्ये
घेऊन कसम साक्ष शिव राया
जातो विसरून संसारा
आठवण येईल लेकरा
माझ्या मायेचा कळवळा
लढवय्ये आम्ही लढवय्ये
लढवय्ये आम्ही लढवय्ये
येऊन धडकेल तोफेचा गोळा
जखमेवर लेप लावीन मातीचा
पडेल, तरीही चालीन, उठेल पुन्हा
पण करणारच शत्रुचा खात्मा
लढवय्ये आम्ही लढवय्ये
लढवय्ये आम्ही लढवय्ये
झेंडा उंचा रहे हमारा
प्रेताच्या ढिगार्यात उभा राहिल तिरंगा
सन्मानाने मरेन लपेटून त्याला
चालू राहील ही लढवय्यांची परंपरा
लढवय्ये आम्ही लढवय्ये
लढवय्ये आम्ही लढवय्ये
