माणसाने माणसाशी माणसा प्रमाणे वागावे
आणि चुकल्यास नियमावलीत पहावे
अटीतटीची भाषा तु बोलायची नाही
त्याने ही बोलायची नाही
त्याच्या वाचून तुझे काय अडलेले नाही
तुझ्या वाचून त्याच काय अडलेले नाही
तु मेला तरी त्याच काय नडत नाही
आणि तो मेला तरी तुझे काय नडत नाही
त्याचे काय आडेल तसे तु त्याला नडू नकोस
तुझे काय आडेल असे तो तुला नडनार नाही
हुंबरी तुंबरी एकमेकांच्या अंगावर जायचे नाही
भांडणाने काय सार्थक होत नाही
उलट मोडेल पाय, मोडेल हात, वाहेल रक्ताचा पाठ
समजून घ्या समजून सांगा
नाहीतर तुमचाच विनाश हाय
विश्वास ठेव त्याच्यावरती
तो ही विश्वास ठेवेल तुझ्यावरती
विश्वासातच सर्व काही मांगल्य आहे.
