आई राजा उदे उदे
आई राजा उदे उदे
वसले चराचरा मध्ये तुझे रूप
सजले डोंगर, दरे, गावोगावी मंदिरे
जगदम्बे करतो तुला नमन
आई राजा उदे उदे ङ
करू नको तु उदे उदे
पैशांचा तु उदे उदे
वेळी काळी ऐनवेळी
मागतकरी होशील
नेहमी हच्चा राखून चल
थोरा मोठ्यांची दुनियादारी लाख मोलाची ठरते
जिथं तुझी हुशारी अडकून पडते
आशिर्वाद त्यांचा
तुझे संकट हरण होते
घाव घाल
पुढे चाल
अंधारात तु मार्ग काढ
मशाल दिवटी तेवत ठेव
लागेल नजर घे आईचे नाव
जळणारे होतील राख
तु फक्त लढ
जगदंब जगदंब