कशी असेल
अशी असेल
तशी असेल
मिळेल तसली मिळेल
नकट नाक गोल चेहरा
पांढरी पाल ना अंगावर मास
मी हो म्हणणार हो मी हो म्हणणार
मला आईने झापल
ऐवढा काय उतावीळपणा
कसली पण करनार काय
तोवर बहिणीने टोमणा मारला
ह्यो लय देखना दिवा हाय
मग कशी असेल
अशी असेल
तशी असेल
मिळेल तसली मिळेल
घरचे बघायचे जोडा
बघण्याच्या कार्यक्रमात भरल्या शंभर जणींच्या ओट्या
माझ्या खोड्या चौकशीत कळायच्या
काहींच्या अपेक्षा मोठ्या असायच्या
वैतागून घरी म्हणालो माझी एकच अपेक्षा
ती मुलगी असावी फक्त
कशी मिळेल
अशी मिळेल
तशी मिळेल
मिळेल तसली मिळेल
पाहुण्याणे पाहुणी निघाली
मुलगी आली पाटावर बसली गालात हसली
थोडक्यात प्रश्न मंजूशा झाली
बाबा म्हणाले
एकमेकांना पाहून घ्या
परत भांडणे नको
तु अशीच हाय
ती असाच हाय
ती जशी असेल तशी असेल
पोहे आले नंतर चहा आला
पोहे झालेले तिखट
चहा झाला गोड
खारट गोड होईल किंवा गोड खारट होईल
मी चांगले म्हणून खानार
ती कशी बनवेल
अशी बनवेल
तशी बनवेल
करेल तसल करेल
एकांतात आम्ही बोलून घेतल
तिझ आणि माझ एकमत आल
आमचं सोयरीक जुळून आल
चाडिची काडी लागायच्या आधी
लग्न करून तिला घरी आणल
कस झाल
अस झाल
तस झाल
झाल तेच चांगलं झाल
