मित्रा मित्राची मैत्री लय भारी
एकमेकांना हिशोबात सांगड घाली
मदतीस संकटकाळी धावून जाई
अशीच मदत दुसर्याला पहिल्याने केली
दोन हजारूपयांची नोट देऊ केली
दुसर्याने खुशीत चहा ची मेजवानी दिली
दिवस लोटून गेले लई
दोन हजार रूपयांची नोट सरकारने बंद केली
पहिल्याला उसन्या दोन हजारांची आठवण झाली
दुसर्याने देऊ देऊ करत बरेच महीने लोटली
खर्या खर्या मैत्रीची भाषाच खोटी झाली
पहिल्याने टोमण्याची मालिका सुरू केली
एकमेकांत शिव्यांची हाणाहाणी झाली
यान अशी घातली त्याने तशी घातली
पण पैशाने मैत्रीत कधी फुट नाही पाडली
