Translate

रविवार, 26 अगस्त 2018

राजकारण


मोर्च्यातून , भाषणातून , दंगलीतून , व्यावसायिक म्हणून , कलाकार म्हणून , गुंड म्हणून , मिळालेल्या आरक्षणातून , चालून आलेल्या संधीतून , कॉलेज मधून, पुढे आलेला एक व्यक्ती  '' पुढारी ''. 
पुढारी, ज्याच्या पासून सुरु होत '' राजकारण ''. 

ज्याच्यासाठी घडत हे राजकारण त्या दोन गोष्टी  '' सत्ता आणि खुर्ची ''. 
सत्ता आणि खुर्ची मिळवण्यासाठी  केल्या जातात कुरघोड्या तेच  '' राजकारण ''.
राजकारण करण्यासाठी वापरली जाणारी एक गोष्ट  ''आश्वासन ''.

आश्वासन देऊन मिळवलेली मत निवडून देतात पुढारी . 
हिस्सा , पद , वयक्तिक काम , पैसा यांचे आश्वासन /आमिष देऊन तयार होतो पक्ष . 
आणि पुन्हा एकदा आश्वासनांचा पाऊस पाडून मिळते ती ''खुर्ची ''. 

खुर्ची जशी बोलते तसा होतो ''विकास ''.
याच विकासाच्या नावाखाली लढवल्या जातात निवडणूका . 

निवडणूका लढवण्यासाठी खर्च होतो अमाप पैसा . 
हाच पैसा मिळवण्यासाठी केला जातो भ्रष्टाचार. 

भ्र्रष्टाचारामुळे पैसा जातो खिशात आणि विकास राहतो आश्वासनात . 
हाच आश्वासनाचा विकास डोळ्यात आणतो पाणी . 

डोळ्यात आलेल पाणी, करून टाकत सत्ता पालट .   
सत्ता मिळाल्यावरची कहाणी पुन्हा एकदा तीच ''राजकारण ''. 

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें

हल्ला बोल

  हल्ला हल्ला बोल हल्ला, खुन खोल रहा, अब बोल हल्ला। शंख फुंकना विजय का ,  सत्ता का माज उतरेगा   बाप हिंदुस्तान; तेरा घमंड तोडेगा  धर्मरक्षा ...