Translate

गुरुवार, 18 अक्टूबर 2018

यमाई देवी महाळुंग


यमाई देवी महाळुंग 




महाळुंग


सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस  तालुक्यातील महाळुंग हे गाव. अकलूज पासून सात किलोमीटर अंतरावर आहे.

महाळुंग हे गाव '' माकडाचे महाळुंग '' या नावाने  प्रसिद्ध आहे.

यमाई देवीचे हेमाडपंती मंदिर महाळुंग गावात आहे.
मंदिराच्या सर्व बाजूंना एक दगडी भिंत आहे. मंदिरात  प्रवेश करण्यासाठी एक मोठा प्रवेशद्वार आहे.

मंदिराच्या समोर डीकमाळ आणि तीर्थ कल्लोळ आहे. पण यातील काहीच अवशेष पहावयास मिळतात कारण काळाच्या ओघात बरीच पडझड झाली आहे.

वर्षातून दोनदा यमाई देवीची यात्रा असते, एक नवरात्र आणि दुसरी अष्टमी. नवरात्र ही आश्विन महिन्यात असते. नवरात्रीत, देवीची नऊ दिवस पूजा होते. नऊ दिवसांत देवीचे नऊ अवतार पहवायास मिळतात.
गावातील, प्रत्येक घरातील एक व्यक्ती राहण्यास देवीच्या आवारात जातो. नऊ दिवसांमधे, मंदिरात बसलेले लोक घरात प्रवेश करत नाहीत आणि गावाच्या वेशी / सीमा पार करत नाहीत.  अष्टमी उत्सव चार दिवस साजरा केला जातो.
महाळुंग गावात गोपिका आईचे दुसरे मोठे मंदीर आहे. गोपिका आईचे मंदीर यमाई देवी मंदीरच्या ठीक पाठिमागे आहे.

महाळुंग गावात यमाई आणि गोपिका मंदिर तर आहेतच पण आणखी इतरही मंदिरे आहेत. गावात रामाचे तसेच हनुमानाचे मंदीर आहे. विठ्ठलाचे मंदीर आहे.

विठ्ठलाचे असे एकमेव मंदीर आहे जेथे  महादेवाची पींड ठीक विठ्ठलाच्या मूर्ती समोर आहे.

शंकराचे मंदिर आहे. खंडोबाचे मंदीर आहे. जोतिबाचे मंदीर तसेच काळभेरवनाथ  मंदीर आहे आणि इतरही काही छोटी मंदीरे आहेत.

यमाई देवी


यमाई देवी ही औंदची देवी आहे.  यमाई देवी येथे आली ती तिच्या भक्तांसाठी.

ही कहाणी त्या वेळची आहे ज्या वेळी मानवरूपी देव होते, म्हणजे प्रभू रामचंद्रच्या काळातील म्हटले तरी चालेल.
गावात गोपिका देवीचे  मंदीर आहे.
गोपिका ही एका गवळ्याची सून होती.
गोपिकाला खुप सासरवास होता. ती नित्य नेमाने यमाई देवीचे भक्ती करत असे.

गोपिका, रात्रीच्या वेळी, घरातील सगळे झोपले असताना, यमाई देवीची भक्ति करण्यासाठी औंद गावाला  जात असे. ती बारा वर्ष सतत देवीची पूजा करत होती.
गोपीका कुठे जाते ? हे उघड करण्यासाठी, तिचा सासू आणि तिचा सासरा आणि पती एके दिवशी  तिच्या मागे गेले.
गोपीकानी औंध गावाला  जाण्यासाठी अतुलनीय (दिव्य शक्ती) वापरली.
गोपिकाचे सासू आणि सासरे आणि पती तिच्या समवेत तेथे  पोहचले.

गोपिकाने  नेहमी प्रमाणे यमाई  देवीची पुजा-आरती केली.  हा सर्व प्रकार तिचे सासू आणि  सासरे आणि पती पाहत होते. त्या दिवशी, यमाई देवी तिला प्रसन्न झाली आणि तिला म्हणाली “ उद्यापासून तुला माझ्याकडे येण्याची गरज नाही, उलट मीच तुझ्या घरी येते “.

ह्या वाक्यावर गोपिका म्हणाली “ आई यमाई मी धन्य झाले पण तु आलेली मला कसे कळणार” ?

त्यावर देवी म्हणाली “ तुझ्या दारात जो ताक घुसळण्याचा जो घुसळखांब आहे त्याला पालवी फुटेल आणि तुझ्या दारात.....तुझ्या  गावच्या कळपातील काळी कपीला वांझ गाईला पान्हा फुटेल आणी घरासमोर आभास गंगा भागीरती येईल’’, आज मंदीराजवळ असणारा आड म्हणजेच  कल्लोळ होय आणि तेंव्हा समज की मी आली आहे.

गोपिका पुन्हा अंतरमनाने महाळुंग येथे आली पण तिचा पाठलाग करणारे तिचे घरचे तेथेच राहिले.

तसेच यमाई देवीने गोपिकाला घरी जात असताना मागे वळून पाहू नको, मी मागोमाग येते असे सांगितलेले असते. थोडे अंतर राहिले असताना गोपिका मागे वळून पाहते की यमाई देवी आली आहे की नाही.

जेव्हा ती मागे वळून पाहते तेव्हा यमाई देवी गोपिकाला तेथेच थांबण्यास सांगते व ती तिने सांगितल्या जागी स्थानापन्न होते.

नंतर दोन चार दिवसांनी तिचे सासू सासरे आणि पती गावात येतात आणि गावातील लोकांना घडलेली कहानी सांगतात व यमाई देवीची स्थापना करतात.

प्रत्येक नवरात्रात शेवटचे पाच दिवस आणि पोर्णिमेच्या दिवशी यमाई देवीचा छबिना गोपिकाला भेटण्यासाठी जातो.

म्हणून तेव्हा पासून लोक नवसाला पावणारी देवी म्हणून नवस बोलतात आणि आपली ईच्छा व्यक्त करतात .














कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें

हल्ला बोल

  हल्ला हल्ला बोल हल्ला, खुन खोल रहा, अब बोल हल्ला। शंख फुंकना विजय का ,  सत्ता का माज उतरेगा   बाप हिंदुस्तान; तेरा घमंड तोडेगा  धर्मरक्षा ...