टोचले जरी खडे, पोळली जरी सडक
जातो शाळेत अनवाणी नाही पायात चप्पल
पाहत होतो आशेने सोबती देईल चॉकलेट
घातला हात खिश्यात निघाली फाटकी नोट
रात्रीचा अंधार त्यात काट्या कुट्याच राण
घ्याया मुक्या जीवाचा प्राण हाती धरली वागर
खाऊन पोटभर मी बोललो अगदी झकास झाला बेत
कानावर पडला आईने विचारलेला बाबास प्रश्न
काय खायाला घालणार उद्या आपल्या संतान
दोन कारली , तीन बटाटी घेतली वांगी पावशेर
किराणा दुकानाततील तेल, शेंगदाणे 100,200 ग्रॅम
पिशवीच्या तळाशी दिसेल हा सगळा बाजार
विचार केला तर पुरेलच कसा हा आठवडाभर
एक टाईम जेवण भागे शेजारच्यांनी दिलेल्या शिळ्यावर
भीक मागायला बसायचो आम्ही देवळा समोर
रोज देवाकडे तीच प्रार्थना दान मिळो एक कोट
नाही एक कोट पण देवाने दिली जादूची कला भेट

