बाळासाहेब
बारा गावचे बारा विषय,
बाळासाहेब त्यांचे नाव,
किरकोळ कामाचे बारा पैसे आकारतात ,
कारण ब्यांकेत करतात कारकून काम,
म्हणून तर ठावुक आहे यांना कोणा कोणाच्या,
सातबार्यावर किती किती आहे लोड,
पोरिंचा त्यांना असणारच नाद कारण वयात आलेत बाळासाहेब,
पण एका मुलीवर करत होते जिवापाड प्रेम ,
ब्यांकेत साहेब म्हणून गाजतात ,
मित्रांमध्ये आशिक म्हणून ओळखले जातात ,
टोमणे मारल्यावर आंडळातात ,
पण आव मात्र आमदारासारखा आणतात ,
आणि म्हणतात कसे आमच्याशी वाकड त्यांची मसणात लाकड ,
तरी राजकारणाचा विषय न बोललेलाच बारा ,
बस बाळासाहेब बस लग्नाचे बघा आता ,
नाहीतर नेता होण्याच्या नादात बाप होण्याचे विसरून जाचाल .
