देवा रुबाबात तु उभा
देवा तुझा रूबाब लय कडक
देवा तुझ्या घाबार्यात मृदंगाचा आवाज
त्या आवाजात भक्त तल्लीन
त्या आवाजात भक्त तल्लीन
देवा चराचरा मध्ये तु स्थित
चराचरा मध्ये पाहतो तुझे रूप
चराचरा मध्ये पाहतो तुझे रूप
देवा छप्पन पावलांचा तुझा प्रवास
पावपावलांना तुझी ओढ
पावपावलांना तुझी ओढ
देवा माझ्या हृदयात तुच
या हृदयाचा तु शिल्पकार
या हृदयाचा तु शिल्पकार
देवा प्रत्येकावर तुझी नजर
तुझ्या नजरेत सर्व एक
तुझ्या नजरेत सर्व एक
देवा ओवी ओवीत तुझे नाव
ओवी ओवीत धर्माची शिकवण
ओवी ओवीत धर्माची शिकवण
देवा मी ठेवलाय भाग बांधून
उलघड नाहितर माझा देह जाळ
उलघड नाहितर माझा देह जाळ

