जळून जळून जळून जळून
चाललेत देह
कोणी आपलेच आहेत
कोणी परकेच नाहीतजाळून जाळून कारभारी थकलेत
जळणार्या झळा आता सहन होत नाहीत
शेवटचे दर्शन झाले तरच होईल
साथ घालवलेले क्षण आठवून घ्यावे रडून
रडून गहिवर घालायला मड सुद्धा समोर ठेवणार नाहीत
कोरोनाने ग्रासले तर लोक वाळीत टाकतील
तरीसुद्धा पाच फूट अंतर सोडून विचारपूस नक्की करतील
घाबरू नका मरणाला
पण मारणारा रोग कोरोना आहे
संपर्क टाळा , मास्क घाला, नियमांचे पालन करा
आणि कोरोनाला पसरवून देवू नका
आपले तपले मनत बसू नका
गाटी भेटी घेण्यासाठी गावो गावी जाऊ नका
तुमच नशीब मोठ आहे
जगला वाचला तर पुन्हा भेट होईल
चहाचे दोन घोट होतील
नाहीतर
जळून जळून जळून जळून
चाललेत देह
कोणी आपलेच असनार आहेत
कोणी परकेच असनार नाहीत

कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें