राजकारणी कुटुंब
राजकारणाचे शिल्पकार
आमचे परम नेते
भाऊ, आबा, काका, मामा
साहेब, तात्या, भैया आणि दादा
साहेबांनी पक्ष स्थापना केली
तात्यांनी जाणतेपणा सांभाळला
आबांनी सरपंचकी काय सोडली नाही
भैयांनी तरूण पिढी एकत्र केली
ती भैया, भैया म्हणु लागली
आणि त्यांची बायको सभापती झाली
भाऊ फक्त हातच वर करायचे
आणि काका भाषण द्यायचे
साहेबांनी पुतण्याला आमदार केल
आणि दीदी पक्ष अध्यक्ष झाल्या
मामांनी चाड्या लावल्या
तशा सूनबाई हट्ट धरून बसल्या
मग काय साहेब म्हणाले
सूनबाई चला संडासाच्या उदघाटनाला

कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें