आमच्या गावाकडची दिवाळी
गावाकडची दिवाळी , हो , गावाकडची दिवाळी
गुणगुणावी वाटली ही "गावाकडची दिवाळी "
खेड्यातील जणांकडून अनुभवावी, ही सणांची मांदियाळी
गणपती झाले, नवरात्र झाली, आता आली दिवाळी
बोनस मिळाला, पगार झाली तर कोणी उचल घेतली
काहिंनी पिशवी भरली आणि मागच्या दिवाळीची बाकी, चुकती केली
शेजारील काकू काकूंची बोलणी, ऐकायला मिळाली
मला दोन हजारांची साडी आणली आणि आमची जाव म्हणाली, जरा पदरातच गेली
तुम्ही म्हणला तुमची चांगली हाय, पण काय सांगू, आमची आत्याच घालून नटली
आणि हो आमच्या यांच्या गाडीच्या नादात, सोन्याची खरेदी राहिली
आम्हाला बुंदी पाडायला, तुमची कढई द्यावी
हो, गेल्या वर्षी आमची, आचार्या कडून करुण सुद्धा बिघडली
पुरूष मंडळी घरावर लायटींग लावण्यात मग्न झाली
तरूण मुलांनी भिजू घातलेली माती शिवरायांचे किल्ले बांधण्यासाठी घेतली
घरावरील आकाशदिवा आणि समोरील किल्ल्याने घराची सुंदरता 10 पटीने वाढवली
आम्ही 50 तोफा घेतल्या तर शेजारच्यांनी 10,000 फटाक्यांची माळ ईर्षीवर घेतली आईने मित्रांची संख्या विचारली मी ती 10, 12 सांगितली
शेख आणि मुलानी फॅमिलीला घरी बोलावूनच फराळ करायला लावावी
मामा, मावशी, सिटीतील आत्या यांना डबा बांधून द्यावा
चव्हाण आणि जाधव यांच्या घरची दोन माणसे गेली, तर त्यांचीही नावे, डब्याच्या लिस्ट मध्ये आई लिहा म्हणाली
भाच्याचा आवाज कानी पडला, बाहेर येऊन पाहिले तर आमची तायडी आलेली
वहिनींनी पिशवी घेतली आणि चहाची तयारी केली, थोडा वेळ गप्पांची महफिल रंगली
गप्पा होताच दादा आला आणि वहिनींना चल म्हणाला, त्यावर तायडी म्हणाली
नवी नवरी माहेरी चालली , आई म्हणाली जावयाला अंगठी घ्या म्हणाव पहिल्या दिवाळीची
ह्या गावा वरूण त्या गावाला, ह्या नातेवाईका च्या घरून त्या नातेवाईका च्या घरी
म्हणूच तर दिवाळी सणाला रस्त्यावरचे रहदारी वाढलेली
धनत्रयोदशी पासून प्रत्येक घरी तुळशी शेजारी दिसतील गवळणी
गाईची पुजा केली जाते वसु बारशी दिवशी
अभ्यंगस्नान करून यम प्राथ॔ना पहिल्या दिवशी
धन, पैशांची आरास घरात यावी यासाठी लक्ष्मीपूजन आणि कुबेर देवाचे पूजन दुसर्या दिवशी
तर व्यावसायिक व्यक्ती वहीपुजन करतात याच दिवशी
शेतात जाऊन पाच पांडव मांडून त्यांची पुजा करतात खेड्यातील शेतकरी
तर बहिण भावाला ओवाळते भाऊबीजी दिवशी
भाऊ ही बहिणीला भेट देतो जसे की खास साडी
तसेच गावातील परंपरे प्रमाणे मातंग समाजातील व्यक्ति औक्षण करण्यास जातात घरोघरी
चिवडा, कानवला आणि एक एक चकली द्यावी
जे धर्म मागायला येतात घरोघरी
दिवाळी संपते ती तुळशी बारशी दिवशी
चार ऊस तुळशीच्या चार बाजूला बांधली,
चार बांगड्या, चिंच आणि बोर तुळशीला ठेवली
असे तुळशीचे लग्न लागते प्रत्येक वर्षी
आमच्या गावाकडे अशी साजरी होते दिवाळी
तुम्हाला सुख समरुद्धी ची जावे ही दिवाळी
शेवटी म्हणतो Happy दिवाळी happy दिवाळी

कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें