मटन
संडासला पळतोय गडी चड्डी धरून धरून
रात्री पिलाया रस्सा परात उचलून उचलून
खातोय मटन मुंडी पिरगाळुन पिरगाळुन
सासर्यानी सरकवली बिर्याणी लिंबू मारुनी
सासू म्हणली ऐवडी भाकरी घ्यावी जावई
कशाचं काय हिकडं झालीना लगीन घाई
कडा कडा हाडके मोडली
दोन भाकरी कुसकारून टाकली
कोंबडीची तंगडी कुरतडून खाल्ली
बायकोने सुके वाडल
बळेच घशाखाली घातल
आता काय सगळ तोंडाशी आल
बेत अगदी झकास झाला
उशीरा का व्हयना मेहुणा कॅटर घेऊन आला
मग बिना पाण्याचा तोंडाला लावला


कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें