Translate

मंगलवार, 24 दिसंबर 2019

मोळी ऊसाची बांधावी







मोळी बांधावी बांधावी
मोळी ऊसाची बांधावी
गोष्ट आमच्या प्रवासाची 
लेका तू आत्मचरित्रात लिहावी 

आमची जात तोडकरी 
नावात गाव " नगरी " 
शर्ट पायजमा बापाच्या अंगात त्यावर ऐट गमजाची 
 माझ्या मायला आहे सवय कास्ट्याची

मोळी बांधावी बांधावी
मोळी ऊसाची बांधावी

टोळी दहा कुटुंबांची दहा गावास फिरावी 
मुकदमाची उचल दहा वाटांनी घालवावी 
कोणी लेकीला आंदन द्यावी 
कोणी कुल्पात ठेवावी 

मोळी बांधावी बांधावी
मोळी ऊसाची बांधावी

चार मेका आणि बांबूनी ताडपत्री तानून बांधावी 
कडेने मातिची रास घालून खोप उभी करावी 
कधी माळरानात कधी शेतकर्यांच्या बांधी 
नगर्यांची वस्ती गावाच्या वेशीवर शोभून दिसावी. 

मोळी बांधावी बांधावी
मोळी ऊसाची बांधावी

डोर आयुष्याची या ऊसा संगे बांधली 
हाती कोयते घेऊन खुंट ना खुंट तोडून काढली 
मागे आईने तुझ्या मोळी बांधावी बांधावी 
गाडी येईल जेव्हा ती भरून द्यावी 

मोळी बांधावी बांधावी
मोळी ऊसाची बांधावी

तोडता तोडता कोयता लागला जरी 
कारभारनीने साडी फाडून बांधावी 
खांदा दुखतो दुखतो मोळी वाहुन ऊसाची 
तुझ्या ताईने  मसाज करून सारी दुखापत घालवावी 

मोळी बांधावी बांधावी
मोळी ऊसाची बांधावी
गोष्ट आमच्या प्रवासाची 
लेका तू आत्मचरित्रात लिहावी 




कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें

हल्ला बोल

  हल्ला हल्ला बोल हल्ला, खुन खोल रहा, अब बोल हल्ला। शंख फुंकना विजय का ,  सत्ता का माज उतरेगा   बाप हिंदुस्तान; तेरा घमंड तोडेगा  धर्मरक्षा ...